⚡बांदा ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने बांदा मंडल भाजपच्या वतीने शहरातील उड्डाणपूलाखाली श्रीराम चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, मानसी धुरी, गुरुनाथ पेडणेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, दादू कविटकर, गुरु कल्याणकर, सिद्धेश महाजन, सिद्धेश पावसकर, सुनील धामापूरकर, निलेश कदम, शुभम साळगावकर, शैलेश केसरकर, समीर कल्याणकर, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर, कैलास गवस, शाम सावंत, आत्माराम गावडे, महेश धुरी, सुनील राऊळ, अक्षय परब, राखी कळंगुटकर आदिसह बांदा मंडल मधील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत चव्हाण साहेब आगे बढोच्या घोषणा देण्यात आल्या.