समाजसेवक संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा…

शंकर गुरव:जि.प.आशिये शाळेत प्राण जीवन सहयोग संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप..

⚡कणकवली ता.३०-: प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी आपली आई श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ आशिये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यांच्या दातृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन आशिये गावचे माजी सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शंकर गुरव यांनी केले.

जिल्हा परिषद आशिये शाळेत प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्ग च्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी रेनकोट वाटप कार्यक्रमात शंकर गुरव बोलत होते

यावेळी मुख्याध्यापक सौ.शिल्पा सावंत,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय बाणे, ग्रा.प.सदस्य सुहास गुरव,सिताराम गुरव,प्रिया पांचाळ,संजना कुबल, सौ.नेहा मोरे, वृषाली मसुरकर, श्री.कदमसर,अंगणवाडी शिक्षिका सौ.तनया बाणे,मदतनिस सौ.पार्वती बाणे, रेश्मा गुरव,प्रेरणा ठाकुर,देवकी काटकर,सौ.गुंजवटे, दर्शना गुरव, जयप्रकाश गुरव,प्रदिप पुजारे व अन्य पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना शंकर गुरव म्हणाले संदीप चौकेकर यांनी प्राण जिवन सहयोग संस्थेच्या वतीने सलग सात वर्षे कला, क्रीडा,शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंत च्या शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात येत असून निश्चितच प्राण जीवन सहयोग संस्थेने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात एक चांगली भेट दिली आहे.आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून संदीप चौकेकर यांनी जोपासले समाजसेवेचे व्रत सर्वांनाच प्रेरणादायी आहे.त्यांच्या संस्थेचे हे उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत.जिल्यातील विविध संस्था आणि मंडळांसमोर एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.असे गौरवोद्गार गुरव यांनी काढले आणि प्राण जीवन सहयोग संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

You cannot copy content of this page