गोरेवाडी घाटी रस्त्याबाबत त्वरित कार्यवाहीचे आदेश द्या…

संदिप पेडणेकर: तहसीलदार यांना निवेदन सादर..

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावर तुळस-गोरेवाडी घाटी येथील रस्ता एका बाजूने खचून गेला आहे. याठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादा गंभीर अघपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास संबंधित दुर्घटनेला प्रशासन जबाबदार राहणार आहे. तरी त्वरित बांधकाम विभागाला आदेश काढून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांना दिले आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा सचिव सुशील चमणकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, तालुका उपाध्यक्ष संतोष मातोंडकर, तालुका युवक अध्यक्ष गजानन कुंभार, ओबीसी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, तालुका चिटणीस संदीप सातार्डेकर, गोपाळ दळवी, श्रीकृष्ण कोंडस्कर, विजय सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी – गोरेवाडी घाडी रस्त्याबाबत वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

You cannot copy content of this page