बॅडमिटन स्पर्धेत साईराज सामंतचे यश…

⚡वेंगुर्ला ता.२७-: कुडाळ येथे सिधुदुर्ग जिल्हा बॅडमिटन असोसिएशनतर्फे निवड चाचणी तथ अजिक्य स्पर्धा २०२५ घेण्यात आली. यात वेंगुर्ल्याचा सुपुत्र तथा वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलचा विद्यार्थी कु.साईराज विनय सामंत याने १७ वर्षाखालील गटामध्ये तसेच खुल्या गटामध्ये अजिक्यपद पटकाविले आहे. या स्पर्धेची पुढची फेरी सातारा येथे होणार असून कु. साईराज हा सिधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे शिक्षण प्रसारक समितीचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष सूर्याजी नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, सर्व संचालक, मुख्याध्यापक संजय परब, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, बेंगलोर येथे होणा-या ऑल इंडिया बॅडमिटन असोसिएशनच्या वैयक्तिक बॅडमिटन स्पर्धेत कु. साईराज सहभागी होणार आहे.
फोटोओळी-श्री सातेरी हायस्कूलतर्फे साईराज याचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page