खोदलेल्या सर्व रस्त्याची कामे पावसापूर्वी पूर्ण करा…

जीवितहानी झाल्यास ठेकेदार व अधिकारी जबाबदार;मनीष सातारडेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

*💫वेंगुर्ले दि.२९-:* पावसाळा सुरू होण्यापूर्वी वेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करावी अन्यथा खोदलेल्या रस्त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित ठेकेदार व न प अधिकारी जबाबदार राहतील,असा इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते ऍड.मनीष सातार्डेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांना दिला आहे. नगरपरिषदकडे दिलेल्या निवेदनात श्री. सातार्डेकर यांनी म्हटले आहे की, सध्या वेंगुर्ले शहरात भूमिगत वीजवाहिन्या तसेच भूमिगत गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम केले आहे. याचा त्रास येथील पादचारी व वाहनधारकांना होत आहे. आता पुढे सुरू होणाऱ्या पावसाळ्याचा विचार करता खोदलेल्या .चरात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. या चिखलात घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे ही दोन्ही कामे संथगतीने सुरू असून यावर न. प. चा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आपला मनमानी कारभार करत असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून सदरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे या निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page