आणीबाणी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन:प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती..
ओरोस ता २३
भाजप संविधानाची मोडतोड करीत आहे, असा आरोप केला जातो. परंतु देशात काँग्रेसचे सरकार असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ पासून अडिज वर्षे लावलेल्या आणीबाणीने देशाच्या संविधानाची कशी तोडमोड केली होती ? हे एक उत्तम उदाहरण आहे. याला ५० वर्ष होत असल्याने काळया कालावधीची आठवण करून देण्यासाठी भाजप २५ जून रोजी ‘संविधानाची हत्या दिवस’ म्हणून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक राजू राऊळ उपस्थित होते. १९७५ मध्ये देशात तत्कालीन सरकारने आणीबाणी लावली होती. त्याला आता ५० वर्षे होत आहेत. संविधानातील एका कलमाचा आधार घेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात हा काळ लादला होता. यावेळी विरोधी पक्षातील नेते, पत्रकार यांना तब्बल अडिज वर्षे जेलमध्ये टाकले होते.
या आणीबाणीला ५० वर्षे होत आहेत. याबाबत लोकांना माहिती नाही. लोक विसरले आहेत. त्यामुळे या काळया कालावधीची आठवण करून देण्यासाठी तसेच त्या काळात झालेल्या अन्याय, अत्याचाराबाबत जनतेला माहिती व्हावी, यासाठी भाजपने संविधानाची हत्या दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. भाजप वर संविधानाची मोडतोड केल्याचा आरोप होत आहे. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसनेच संविधानाची मोडतोड केली आहे. आणीबाणी सारखी परिस्थिती लादली होती. खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या केली होती. त्याची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
पत्रकार भवन येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम
२५ रोजी दुपारी ३ वाजता संविधानाची हत्या दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार असून या जिल्हास्तरीय कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ अजित गोगटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी गोवा राज्यातील माजी खा एड नरेंद्र सवाईकर हे आणीबाणी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
चौकट
सिंधुदुर्गातील १३९ जणांना अटक
आणीबाणीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३९ जणांना जेल झाली होती. एक व्यक्ती तर जेवणाचा डबा द्यायला गेल्याने त्यांना जेलमध्ये टाकले होते. यात महिलांचा सुध्दा समावेश होता. तब्बल अडिज वर्षे त्यांनी हा कारावास भोगला होता. यात अनेकांच्या कुटुंबांचे हाल झाले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने आणीबाणी कालावधीत जेल भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे, असे यावेळी अतुल काळसेकर यांनी सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: