वीज वितरण अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांचे आश्वासन:तोपर्यंत वीज समस्या सोडविण्यासाठी सावंतवाडीत केंद्र..
सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तालुक्यातील 14 गावे च्या समस्या अडचणी संदर्भात तात्काळ वीज वितरणचे समस्या केंद्र सावंतवाडी तालुक्यात उद्या 24 जून पासून सुरू करण्यात येईल. त्यानंतर दोन महिन्यात ही सर्व गावे सावंतवाडी तालुक्याला जोडण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेण्यात येईल मात्र तत्पूर्वी या चौदाही गावांचा गण अहवाल सादर करावा सर्व पाहणीनंतर निश्चितपणे त्यावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन वीज वितरण चे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी 14 गावांच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.
आज सोमवारी या 14 गावांच्या समस्यांचा पाढा अधीक्षक अभियंता श्री रा ख. यांच्यासमोर शिष्टमंडाने मांडला . वेंगुर्ले तालुक्यात ही 14 गावे समाविष्ट आहेत त्यामध्ये मळेवाड गु ळदुवे. नेमळे आजगाव. धाकोरे या गावांचा समावेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली या चौदा गावांचे शिष्टमंडळ आज कुडाळअधीक्षक अभियंता श्री राख यांच्या कार्यालयात भेट घेतली.
यावेळी श्री राऊळ. यांनी ही चौदा गावे सावंतवाडी तालुक्याला तात्काळ जोडा अन्यथा आम्हाला दोन महिन्यात व्यापक आंदोलन छडावे लागेल असे स्पष्ट केले यावेळी नवीन वीज मीटर बसवण्याची सक्ती करू नये तसेच तिन्ही तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आपण लक्ष द्यावे असे स्पष्ट केले यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब. चंद्रकांत कासार शब्बीर मणियार. आबा केरकर उदयपारीपत्ते यांनी विविध समस्या व अडचणी स्पष्ट केल्या यावेळी .
वीज वितरण च अधीक्षक अभियंता. अभिमन्यू राख यांनी 33 केव्ही लाईन मध्ये झाडेझुडपे नियमित संपर्क देतात त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे एप्रिल मे महिन्यात खरं तर वीज कर्मचाऱ्यांनी विज लाईनवरील झाडे तोडणे आवश्यक होते. मात्र हे केले गेले नाही यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यामुळे अडचण निर्माण झाली मात्र. आता निश्चितपणे ती सुधारणा केली जाईल कुडाळ तालुक्यात वीज पुरवठ सुरळीत करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आहेत आता जिल्ह्यातील इतर तालुक्यातही सर्व ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने उपाय योजना हाती घेतले आहेत. सबस्टेशन फिडर मध्ये ज्या अडचणी उद्भवत आहेत त्या दूर केल्या जातील. ग्राहकांना कोणत्याही समस्याला तोंड द्यावे लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल
14 गावे ही सावंतवाडी तालुक्यातील आहेत तसा अहवाल सादर करा गण मध्ये कुठल्या भागात ही गावे आहेत याचाही समावेश करून तसा परिपूर्ण अहवाल सादर करा निश्चितपणे आपण वरिष्ठ कार्यालयाला हा अहवाल सादर करू असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. या गावांच्या प्राथमिक अडचण दूर करण्यासाठी या गावातील समस्या अडचणी काय असतील तर ते केंद्र सावंतवाडी तालुक्यात सुरू केले जाईल आणि या समस्या अडचणी सावंतवाडी तालुक्याचे वीज अधिकारी वेंगुरला तालुक्याला कळवतील आणि त्यानुसार त्या सोडवल्या जातील अशी व्यवस्था ही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.. वीज अधिकारी शिंदे व वीज कर्मचारी धोंड यांची सखोल चौकशी केली जाईल असे. त्यांनी स्पष्ट केले.. यावेळी शब्बीर मणियार. मनोहर आरोंदेकर. बाळू माळकर. गोविंद केरकर विद्याधर नाईक निवृत्ती नाईक संतोष पेडणेकर सौ सुभद्रा नाईक शिल्पा नाईक. स्मिताली नाईक. सिद्धू नाईक सचिन मुळीक निदात पांगम. दिलीप बहिरे. सखाराम राऊळ सिद्धेश निंबळेकर वासुदेव राऊळ हरेश पेडणेकर. दत्तराज कोरगावकर. शुभम सातार्डेकर दीपक सातारकर प्रशांत सातार्डेकर गौरेश तुळसकर.. आधी उपस्थित होते. फोटो सावंतवाडी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री अभिमन्यू राख यांच्याशी सावंतवाडी तालुक्यातील 14 गावांच्या समस्या अडचणी संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिष्टमंडळ चर्चा करताना संपर्कप्रमुख रुपेश राऊळ बाजूला चंद्रकांत कासार मायकल डिसोजा शब्बीर मणियार. श्रेया परब आबा केरकर. उदय पारिपत्ते बाळू माळकर आधी