तालुका बंद ला व्यापारी संघाचा पाठिंबा ;…

प्रशासनाला सहकार्य करावे;तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर यांचे आवाहन

*💫कणकवली दि.२९-:* कणकवली तालुक्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे.बाधित रुग्ण आणि मृतांची संख्याही तालुक्यात सर्वाधिक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण तालुका 10 दिवस कडकडीत बंद ठेवत उत्स्फूर्त जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय आज पं स सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 मे ते 10 मे दरम्यान च्या 10 दिवसांच्या जनता कर्फ्युला कणकवली तालुका व्यापारी संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी सांगितले.1 मे ते 10 मे दरम्यान मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहन दीपक बेलवलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page