*💫मालवण दि.२९-:*करोना महामारीच्या काळात जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी ‘गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे रक्तदान’ हा नारा देत रक्तदान मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत शिवसेना पेंडुर विभागातर्फे नाथ पै सेवांगण कट्टा येथे या रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लसीकरणाच्या पूर्वी जिल्ह्यातील तरूणाईने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले. तसेच संपुर्ण तालुक्यातील गावांमध्ये रक्तदान शिबीराची मोहीम यशस्वी पणे राबविणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली. दानशुर रक्तदात्यांचे शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज , महिला तालुका प्रमुख श्र्वेता सावंत, सेवांगण कार्याध्यक्ष दिपक भोगटे, डॉ. सावंत, अण्णा गुराम, बाबू टेंबुलकर, महेश गावडे, दर्शन म्हाडगूत, देवदास रेवडेकर, प्रशांत भोजने, दादा वायंगणकर,विष्णु लाड,बाबू कांबळी,गोट्या पवार,प्रदीप सावंत,राजू गावडे,संदिप सावंत,शिरिष गोंधळी यांसह शिवसैनिक उपस्थित होते. कोरोना सारख्या भीषण काळात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे डॉक्टरांनी आभार मानले.
