⚡बांदा ता.२२-:
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शनिवार दि. २८जुन पासुन प्रारंभ होत आहे.
या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ५ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून रविवार दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ भजनकर्मी तथा वीणा सप्ताह नियोजनप्रमुख प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली
पारप्रमुख व सेवेकरी मंडळींची शुक्रवारी श्री विठ्ठल मंदिरात बैठक झाली. यावेळी संदेश पावसकर, सुदन केसरकर, भाऊ वाळके, सुनील नाटेकर, विनीत पडते ,निलेश महाजन, साईराज पावसकर, श्रीप्रसाद वाळके ,अजय महाजन, मंगलदास साळगांवकर, प्रथमेश गोवेकर, आशुतोष भांगले, अजय परब, मंथन विरनोडकर, अचल पावसकर आदी सेवेकरी उपस्थित होते.
यावेळी निश्चित केलेले सप्ताहाचे पार पुढील प्रमाणे आहेत.
१) शनिवार दि. २८ जुन आळवाडा -विनीत पडते, २) रविवार दि. २९ जुन रोजी निमजगा गवळीटेंब- संदेश पावसकर, ३) सोमवार दि. ३० जुन रोजी
हॉस्पिटल कट्टा – उमेश काणेकर, भाई शिरसाट ४) मंगळवार दि.१ जुलै रोजी गांधी चौक – सुदन केसरकर ५) बुधवार दि. २ जुलै रोजी मारुती गल्ली- दत्तप्रसाद पावसकर ६) गुरुवार दि. ३जुलै रोजी देऊळवाडी- श्रीप्रसाद वाळके ७) शुक्रवार* दि.४ जुलै रोजी उभाबाजार- निलेश महाजन
शनिवार दि. २८ जुन रोजी सकाळी १२ वाजता श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत वीणा घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. शनिवार दि. ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सप्ताहाची सांगता होईल.
सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे
आवाहन श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो – (बांदा श्री विठ्ठल मंदिर हरिनाम वीणा सप्ताह नियोजन बैठकीसं उपस्थित पारप्रमुख व सेवेकरी )