सावंतवाडी (प्रतिनिधी): कै सौ सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा, सावंतवाडी नं. २ येथे आज, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक श्री विकास गोवेकर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक श्री गोवेकर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम आणि त्याचे महत्त्व सांगितले. ताडासन, वज्रासन, भुजंगासन, त्रिकोणासन यांसारख्या आसनांचा सराव विद्यार्थ्यांनी केला.
या उपक्रमात शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. “योगा फॉर वेलनेस” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल सकारात्मक विचार रुजविण्यात आले,