⚡मालवण ता.२१-:
मालवण येथील सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त कै. दादा आचरेकर स्मरणार्थ नारळ लढविणे स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी येथे सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १ लाख ११, १११ रुपये, द्वितीय – ५५,५५५, रु., तृतीय – १५,५५५ रु., चतुर्थ-११,१११ रुपये तसेच आकर्षण चषक असे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट शिस्तबद्ध व उत्कृष्ट प्रहार यासाठी भेटवस्तू देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी संजय घरत ७७९८९९८९४९ व रोहन आचरेकर ९३२५२०१३७५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश आचरेकर मित्रमंडळाने केले आहे.
