⚡वेंगुर्ले ता.२१-:
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी तलावातील पाण्यात योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आगळावेगळा योग दिन वेंगुर्ले येथील जलतरण तलावात सादर करण्यात आला.
आळस ,थकाव, व तणाव दूर करण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी स्विमिंग हा एक उत्तम पर्याय आहे .आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने देशभरात योग दिन साजरा होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योग दिन साजरा करण्यात आला मात्र वेंगुर्ले येथील जलतरण तलावात प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगळावेगळा जलतरण तलावातील पाण्यात प्रात्यक्षिकाद्वारे योग दिन साजरा केला यामध्ये फ्लोटिंग, अंडरवॉटर, प्राणायाम व हास्य असे योग प्रकार सादर करण्यात आले.
वेंगुर्ले येथे जलतरण तलावातील पाण्यात सादर केला योग दिन…
