⚡मालवण ता.१९-:
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ( मुंबई) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शास्त्रीय गायन / वादन परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून या परीक्षांमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. हायस्कुल व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी भंडारी हायस्कुल व प्राथमिक शाळेतून प्रविष्ठ झालेल्या १४ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर एक विद्यार्थीनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला.
शास्त्रीय गायन / वादन परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
प्रारंभिक (गायन)- प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – नुपूर निलेश कांदळगावकर, भूमि भूषण परसनाईक, रेणुका गुरुनाथ चव्हाण, द्वितीय श्रेणी – पायल गणेश बिरमोळे. प्रवेशिका प्रथम (गायन)- सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले – नागेंद्र तारी, दीप्ती वाघमारे, रिया केळुसकर, यशश्री मोरजकर, गौरांग लूडबे, स्पृहा भोवर, पूर्वा चोपडेकर, कृपा साळगावकर, रिद्धी मडये. प्रवेशिका प्रथम (हार्मोनियम) – आदित्य हारगिले (प्रथम श्रेणी).
विद्यार्थ्यांना संगीत मार्गदर्शक विजय बोवलेकर, तबला साथ देणारे मंगेश कदम, आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक श्री. पेंडूरकर सर व मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे सहकार्य लाभले. तसेच या विद्यार्थ्यांना श्री. विजय नारिंग्रेकर यांनी संगीत वाद्य उपलब्ध करून दिली तर निरंजन कांदळकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली.