⚡बांदा ता.१९-: पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणाऱ्या येथील तेरेखोल नदीची तसेच पूरबाधित क्षेत्राची पाहणी आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने केली. तेरेखोल नदीपात्रासह पूर बाधित क्षेत्राची पाहणी देखील पथकाने करत स्थानिकांकडून तसेच प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. यावेळी बांदा तलाठी फिरोज खान भाजपाचे बांदा शहर उपाध्यक्ष शैलेश केसरकर उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने केली तेरेखोल नदी क्षेत्राची पाहणी…!
