बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे वाटप…

शिवसेना पक्ष स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेचा अनोखा उपक्रम

कुडाळ : शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आज सगळीकडे मोठया उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्या अंतर्गत आज तुळसुली तर्फ माणगाव येथे आनंद वारंग यांनी सुरू केलेल्या बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले.
आज कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आज विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज तुळसुली तर्फ माणगाव येथे श्री.आनंद वारंग यांनी सुरू केलेल्या बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले.बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेण्यात येणारी गोवंशीय जनावरे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून नाईलाजाने सोडून दिलेली तसेच अन्य बेवारस जनावरे यांचे पालनपोषण आनंद वारंग हे तुळसुली त माणगाव याठिकाणी दोन वर्षांपासून श्रीकृष्ण गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून स्वकष्टातून कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा अन्य मदत न घेता करत आहेत. याठिकाणी सुमारे ६० हुन अधिक गोवंशीय भाकड जनावरे दाखल आहेत.या जनावरांना सुक्या चाऱ्याची कमतरता असल्याचे गोरक्षक स्वरूप वाळके यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुका शिवसेना  पक्षाच्या वतीने या जनावरांसाठी आवश्यक असणारा सुका चारा सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय पडते, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर त्याचप्रमाणे रत्नाकर जोशी, रचना नेरुरकर, नगरसेवक श्रुती वर्दम,  पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, अनिकेत तेंडोलकर, रेवती राणे, स्वरूप वाळके, शुभम नाईक, सुनील गायकवाड आदी उपस्थित  होते…

You cannot copy content of this page