माजी नगरसेवक यतीन खोत यांची कार्यतत्परता..
⚡मालवण ता.१८-:
मालवण शहरातील फोवकांडा पिंपळपार व टोपीवाला हायस्कुल येथे असलेले हायमास्ट टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत फोवकांडा पिंपळपार येथील रिक्षा व्यावसायिक व नागरिकांनी माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यानंतर यतीन खोत यांच्या माध्यमातून हे दोन्ही हायमास्ट टॉवर दुरुस्त होऊन पुन्हा प्रकाशमान झाले.
फोवकांडा पिंपळपार येथील व टोपीवाला हायस्कुल समोरील हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद असल्याने रात्रीच्या वेळी हे परिसर अंधारमय झाले होते. यामुळे पादचारी नागरिक, रिक्षा व्यावसायिक, विद्यार्थी यांची गैरसोय होत होती. याबाबत नागरिक व रिक्षा व्यावसायिक यांनी माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधले. खोत यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत दोन्ही हायमास्ट टॉवर दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही सुरु केली. खोत यांच्या माध्यमातून हे दोन्ही टॉवर पूर्ववत होऊन प्रकाशमान झाले. याबद्दल फोवकांडा पिंपळपार येथील रिक्षा संघटनेतील रिक्षा व्यावसायिक महेश मयेकर, मंगेश मांजरेकर, नितीन धुरी, अमर धुरी, निलेश लुडबे, सुमन सामंत, विनायक खोत, तसेच टोपीवाला हायस्कुलचे पप्पू सामंत, महेंद्र चोपडेकर, विनोद शिरोडकर, मनोज शिरोडकर तसेच नागरिकांनी यतीन खोत यांचे आभार मानले.