⚡मालवण ता.१८-:
शिवसेना वाढत असताना सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांच्यासारखी जनतेची हीत जोपसणारी माणसे पक्ष प्रवेश करत आहेत. याचा आनंद आहे. गावच्या विकासासाठी तुम्ही सांगाल ती कामे पुर्ण केली जातील. एकही विकासकाम गावात शिल्लक ठेवणार नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू. अशी ग्वाही मालवणचे आमदार निलेश राणे यांनी देवली येथे बोलताना दिली.
मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच आहे. देवली वाघवणे येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे देवली ग्रामविकास पॅनेलचे सरपंच शामसुंदर वाक्कर यांनीही गावातील अनेक सहकारी ग्रामस्थांसह आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुर तुळसकर, तालुका समन्वयक कवीत मोंडकर, उपतालुका प्रमुख प्रियंका मेस्त्री, प्रियांका कुमावत, लड्डिन फर्नांडिस, स्नेहा घाडीगावकर, रश्मी तुळसकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर यासह दीपक चव्हाण, विजय चव्हाण, रामू चव्हाण, गुरुनाथ पाटकर, आपा चव्हाण, दाजी चव्हाण, शिवदास चव्हाण, वासुदेव चव्हाण, मोहन चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, अनिल आचरेकर, रुपेश आळवे, संदेश वेतुरेकर, संतोष आळवे, निलेश चव्हाण यावेळी चंदू चव्हाण, अत्युत्य चव्हाण, तुषार चव्हाण, गोविंद चव्हाण, आकाश बिरमोळे, अक्षय जाधव, सुधीर चव्हाण, शशांक चव्हाण, ऋषी चव्हाण, मंगेश गोवेकर, दत्ता गोवेकर, समीर आळवे, जगू हडकर, गणेश चव्हाण, चेतन भोगावकर, गणेश सारंग, राजा सावंत, अर्जुन चव्हाण, आशु चव्हाण, वैभव चव्हाण, हर्ष चव्हाण, रघुनाथ चव्हाण, काशीराम चव्हाण, रुपेश चव्हाण, सिद्धेश बिरमोळे, प्रियंका चव्हाण, आस्था चव्हाण, शोभा चव्हाण, अन्विता चव्हाण, दीप्ती चव्हाण, मीना चव्हाण, नंदिता चव्हाण, रुपाली चव्हाण, श्रीशा चव्हाण, वेधा चव्हाण, सीमा गोवेकर, यमुना चव्हाण, आरती चव्हाण, गार्गी चव्हाण यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेले शब्द सहा महिन्यातच पूर्ण केले आहे. आम्ही जनतेला दिलेले शब्द आमदार निलेश राणे पूर्ण करत आहेत. विधिमंडळात मतदार संघाचा हक्काचा आवाज आमदार निलेश राणे यांच्या रूपाने घुमत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन व दिलेला शब्द पाळणारे आमदार या विश्वसाने अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत आहे. प्रवेशकर्त्यांचा शिवसेनेत सन्मान केला जाईल. देवली सरपंच ज्या विश्वासाने शिवसेनेत प्रवेश केला आहे तो विश्वास सार्थ ठरवणार. देवली गावातील सर्व प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडवले जातील असा विश्वास जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी संजय पडते म्हणाले, आमदार निलेश राणे हे आक्रमक नेतृत्व आहे. विकासकामासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. जनतेच्या हक्काचा आमदार निलेश राणे यांच्या रुपाने मतदार संघाला मिळाला आहे. जिल्ह्यात विकासाचे राणे पर्व पुन्हा सुरु झाले आहे असे संजय पडते यांनी सांगितले.
सरपंच शामसुंदर वाक्कर यांनी देवली गावच्या इतिहासात सुवर्णं अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. आमदार निलेश राणे यांच्या रूपाने गावात विकासाचा राजमार्ग निश्चित झाला आहे. विकासाची धमक असलेले नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन गावच्या गतिमान विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.