सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करत उत्साहात साजरा केला प्रवेशोत्सव …

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोष व
उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले . शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रंगीत फुग्यांचे दालन तयार करून शालेय इमारतीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन वर्ग खोल्यांमध्ये शिक्षकांच्या मदतीने बसविण्यात आले .
स्वागत समारंभाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम.निलोफर बेग
यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगत पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . यानंतर इयत्ता १ली ते १०च्या प्रत्येक वर्गाने वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक संदेश दिला .मान्यवरांच्याही हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला . आजच्या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ‘ सेल्फी पॉईंट ‘ ठरले . यावेळी सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री .इम्तियाज खानापुरी , उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सहसचिव
श्री . सुलेमान बेग , विश्वस्त श्री . समीर बागवान ,
श्री .मुश्ताक बागवान, शिक्षक -पालक संघ कार्यकारणी समितीचे सदस्य प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्री . निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सर्वांनी विद्यार्थ्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page