⚡मालवण ता.१४-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून फळे आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण शहराध्यक्ष सागर जाधव, पार्थ परब, अनिल चव्हाण, डॉ. संदीप तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. या वाटपाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.