होडावडेचा सुपुत्र बनला कोकण रेल्वेचा असिस्टंट लोको पायलट…

⚡वेंगुर्ला ता.१४-: होडावडे-कस्तुरबावाडीचा सुपुत्र आशिष अशोक होडावडेकरने कोकण रेल्वेची कठीण समजली जाणारी लोको पायलट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नुकतीच त्याची कोकण रेल्वेवा असिस्टंट लोको पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  आषिशने आपले शालेय शिक्षण गावातच मराठी शाळेतून पूर्ण केले. २०१६ मध्ये त्याने बीई मॅकेनिकल ही पदवी संपादन केली होती. रेल्वे इंजिन चालविणा-या चालकाला लोको पायलट असे संबोधले जाते. भारतीय रेल्वेमधील एक अत्यंत महत्वाचे आणि जबाबदारीने परिपूर्ण असलेले हे पद आहे. आरआरबीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या लोको पायलट परीक्षेत त्याने यश संपादन केले असून असिस्टंट लोको पायलट म्हणून त्यांची तात्काळ नियुक्तीही झाली आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो नियमित लोको पायलट म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

फोटो – आशिष होडावडेकर

You cannot copy content of this page