कोरोना काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य दया…

संजना सावंत यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी ता २८ कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर करार पद्धतीने भरती झालेल्या उमेदवारांना यापुढे होणाऱ्या शासनाच्या कायम नियुक्तीच्या भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम द्यावा. तसेच त्यांना अधिकचे गुण देण्याबाबत शासन निर्णय व्हावा. अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोविड-१९ या साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागाअंतर्गत तातडीची करार पद्धतीने नोकर भरती केली जात आहे. सदरची भरतीप्रक्रिया हि करार पद्धतीची असल्याने संबंधित भरती झालेला उमेदवार आपल्या भवितव्या विषयी शाशंक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या उमेदवारांना करार पद्धतीने नियुक्ती दिलेली आहे. तसेच कोरोना काळात जीव धोक्यात घालून ज्या उमेदवारांनी आरोग्य सेवा बजावली आहे. अशा उमेदवारांना या पुढे होणाऱ्या शासनाच्या कायम नियुक्तीच्या नोकर भरती प्रक्रियेवेळी अधिकचे गुण देण्याबाबत किंवा प्राधान्यक्रम देण्याबाबत शासन निर्णय व्हावा. अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

You cannot copy content of this page