सावंतवाडी न प ची धडक कारवाई
*💫सावंतवाडी दि.२८-:* कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात व्यापार करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिले असताना देखील सावंतवाडी येथील भाजी मंडई मधील एका कपड्याच्या व्यापाऱ्याने वेळेनंतर देखील आपले दुकान सुरू ठेवल्याने त्या दुकानावर नगरपालिकेने आज धडक कारवाई केली आहे. या कारवाईत या दुकानाला सील करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दुकान मालका विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
