वायरी भूतनाथ येथील रक्तदान शिबिरात १८ जणांचे रक्तदान…

हनुमान जयंती निमित्त केले होते आयोजन

*💫मालवण दि.२८-:* हनुमान जन्मोत्सवा निमित्त वायरी भूतनाथ येथील हनुमान जयंती उत्सव मंडळातर्फे मंगळवारी श्री. अ. के. टिकम गुरुजी विद्यामंदीर, वायरी भूतनाथ येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रक्तदाते राजु बिडये आणि मंदार लुडबे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात वायरी येथील भाग्यश्री चव्हाण ही युवती सर्वात तरुण रक्तदाता ठरली. यावेळी सूर्यकांत फणसेकर, नाना नाईक, गोविंद गोसावी, भाई मांजरेकर, हेमराज सावजी ,मिथुन मालंडकंर, राजन गोसावी, योगेश कांबळी, बाबल गोसावी, संजय गोसावी, नितेश म्हसकर, विजय मांजरेकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीचे सर्व नियम पाळुन हे शिबिर पार पडले.

You cannot copy content of this page