⚡मालवण ता.१३-:
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने आणि लकी कांबळी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील युट्यूबर्स व रिल मेकर्स यांची विचार सभा १५ जूनला सकाळी १०.३० वाजता येथील विजया बेकरी, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत पावसाळी पर्यटन वाढीसाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्या संबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा करून अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार आहे. तरी संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे सहकार्यवाह अभय कदम यांनी केले आहे.