⚡मालवण ता.१३-:
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने मराठी समकालीन साहित्यातील अग्रेसर नाव जयंत पवार यांच्या कथा-नाटक पत्रकारितेतील आठवणी जागृत करणारे संमेलन मालवण चिवला बीच येथील बॅ. नाथ पै सेवांगणात रविवार दि. २२ जूनला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक अॅड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून डॉ. दत्ता घोलप यांचे ‘जयंत पवार यांचे कथात्म साहित्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अनिल गवस यांची ‘जयंत माणूस आणि लेखक कलावंत’ या विषयावर मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विलास कोळपे संवाद साधणार आहेत.