शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
मालवण दि. ( प्रतिनिधी )
मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायत येथे बुधवार दिनांक ११ जून रोजी शेतकऱ्यांसाठी विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तज्ञ कृषि अधिकाऱ्यां मार्फत भातपीक आणि फळबाग लागवड या विषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, विभागीय कृषी अधिकारी श्री. उमाकांत पाटील, प्रकल्प उप संचालक आत्मा श्रीम. प्रगती तावरे, तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भास्कर काजरेकर , श्री. सुयश राणे, उप कृषी अधिकारी कट्टा श्री. डी. के. सावंत, सहा. तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री. निलेश गोसावी कृषी सेवक श्री. नितेश पाताडे व शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. काजरेकर यांनी विकसित कृषी संकल्प अभियान, शेतीपूरक मत्स्य पालना विषयी माहिती दिली यांनी दिली. उप विभागीय कृषी अधिकारी श्री. पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना बायोचार तसेच PMFME योजने बद्दल विस्तृतरित्या मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री गुरव यांनी शेतकऱ्यांना जैविक निविष्ठाबाबत तांत्रिक माहिती दिली, प्रकल्प उप संचालक आत्मा श्रीम. तावरे मॅडम यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियानाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच उप कृषी अधिकारी श्री डी के सावंत साहेब यांनी कृषि विभागाच्या सर्व योजनांची माहिती दिली.