बांदा कट्टा कॉर्नर येथे राहत्या घरासमोर लावलेली बुलेट अज्ञात चोरट्याने पळवली…!

⚡बांदा ता.०६-: बांदा कट्टा कॉर्नर येथे राहत्या घरासमोर लावलेली बुलेट अज्ञात चोरट्याने पळवली. गुरुवारी मध्यरात्री बुलेटची चोरी झाली असुन बुलेट चोरी करत असतानाचे सिसिटीव्ही फुटेज मिळाले आहे. भर बाजारपेठेत बुलेटची चोरी झाल्याने बांदा पोलीसांच्या गस्तीबाबत प्रश्न उभा राहत आहे. सदर बुलेट मालक रोहित श्रीकृष्ण काणेकर यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बांदा कट्टा कॉर्नर येथे भरबाजारपेठेत काणेकर कुटुंबीय राहतात. रोहित काणेकर यांनी आपल्या मालकीची एमएच ०७एसी ९४१० बुलेट आपल्या घरासमोर लावली होती. त्या सोबत त्यांच्या अन्य गाड्या सुद्धा होत्या. सकाळी उठून बघितलं तर गाडी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी बांदा पोलिसांत तक्रार दिली.
गजबजलेल्या ठिकाणी काणेकर यांचे घर असुन त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदर बुलेट चोरी करताना चोरटा दिसत आहे. सदर चोरटा युवक असुन त्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. बांदा शहर हे गोवा राज्य सीमेलगतचे मुख्य शहर आहे. शहरात रात्रभर पोलीस गस्त चालू असते मात्र असे असताना ही बुलेट चोरी झाल्याने पोलिसांच्या गस्ती बाबत संशय व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page