गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी…

माजगाव येथील घटना: रिक्षा चालक किरकोळ जखमी..

⚡सावंतवाडी, दि. ०६:-: माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी समोर, रात्री ९:३० च्या सुमारास, रस्त्यावर आडवा आलेला गवा रेडा एका रिक्षासमोर अचानक आला आणि रिक्षा पलटी झाली.

या अपघातात आनंद परुळेकर (रा. मळगाव) हे रिक्षाचालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि शंभू वीरनोडकर व स्वरूप नाटेकर यांनी तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावलेवन्यप्राण्यांचा वाढता वावर, मानवी वस्त्यांत होणारी अतिक्रमणे, आणि जंगल नष्ट होण्याच्या पार्श्वभूमीवर या घटना घडत आहेत. हे थांबवण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page