संदीप गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत ‘एक झाड मातृभूमीसाठी’ उपक्रम उत्साहात…

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी ‘एक झाड मातृभूमीसाठी’ हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीतील कावळेसद पॉईंट येथील “Flower Valley” परिसरात हा उपक्रम पार पडला.

या उपक्रमात गडदे, पेठे कावळेसद पॉईंट तसेच रस्त्यालगत सुमारे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद सावंत, माजी सरपंच व विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

उपक्रमाचे उद्घाटन सकाळी ९:३० वाजता करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. ग्रामस्थ व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

You cannot copy content of this page