तेंडोली-भोमवाडीत ८ जून ला संयुक्त दशावतार…!

⚡कुडाळ ता.०६-: तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्यावतीने ८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता तेथीलच श्री अनलादेवी मंदिरात जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचे ‘भानुमती स्वयंवर’ संयुक्त दशावतार नाटक होणार आहे.
या नाटकात पुढील कलाकार आहेत. गणपती- नाना प्रभू, रिद्धी-सिद्धी-चैतन्य राऊळ,
भीष्म- संजय वालावलकर, दुर्योधन- साईप्रसाद तवटे, कर्ण-गिरीश राऊळ, शल्य- साहिल तळकटकर, अर्जुन- विलास तेंडोलकर, राजा- आनंद नार्वेकर, शकुनी- सुनील खोर्जेकर, भानुमती- यश जळवी, सुप्रिया-सिद्धेश मुणनकर, नवरा-पिंट्या दळवी. तर संगीत साथ- हार्मोनियम- अमोल मोचेमाडकर, पखवाज- अर्जुन सावंत, झांज वादक-विनायक राऊळ यांची आहे.
नाट्यरसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page