Headlines

आनंदयात्रीतर्फे रविद्र चव्हाण यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदकडून उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचा आनंदयात्री वाङ्मय परिवारातर्फे ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

  श्री.चव्हाण यांनी आनंदयात्रीच्या कार्याचे कौतुक करत, विवेकानंदांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणणारे हे कार्य प्रेरणादायी असून, या हॉलमधून नव्या पिढ्यांना दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले. तर हा हॉल म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांचा ध्वज आहे. हे स्मारक वेंगुर्ला शहराला नवचैतन्य देणारे ठरेल, असे मत वृंदा कांबळी यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा.सचिन परूळकर, महेश राऊळ, पी.एस.कौलापुरे, विद्या कौलापुरे, प्रितम ओगले, चारूता दळवी, पि.के.कुबल, सीमा मराठे, शशांक मराठे, जानवी कांबळी, विशाखा वेंगुर्लेकर, चैत्यन दळवी आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page