गुरुनाथ नार्वेकर यांनी दिला प्रा. उदय खानोलकर वाचनालयाच्या संचालक मंडळाचा राजीनामा…

⚡बांदा ता.२९-: आपण मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या संचालक मंडळाचा काही अपरिहार्य कारणास्तव राजीनामा देत असल्याचे गुरुनाथ नार्वेकर यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. सन २०२५ ते २०२८ च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळात संचालक म्हणून त्यांची बिनविरोध निवड झालेली होती.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आपण वाचनमंदिरच्या स्थापनेपासून वाचनालयाशी जोडलेले गेले आहोत. गेली दहा वर्षे वाचनालयाच्या कार्यवाह पदावर आपण कार्यरत होतो. या दरम्यान वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच वाचन संस्कृतीची चळवळ घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केलेत.
आपल्याकडे सामाजिक क्षेत्रातील अन्य संस्थांची जबाबदारी असूनही वाचनमंदिरला जास्तीत जास्त वेळ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला.या कार्यवाह पदाच्या कालावधीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.

You cannot copy content of this page