*त्या बेपत्ता वृद्धाने आत्महत्या केल्याचा संशय

*खाडी पात्रात शोध सुरू; खाडी किनारी सापडली वस्तू आणि चिठ्ठी

*💫मालवण दि.२७-:* वराड येथे सुरू असलेल्या ब्रिजच्यालगतच्या खाडीपात्रात उतरलेले रविकांत केशव पराडकर (वय-७५) रा. वराड भंडारवाडी हे वृद्ध पाण्यात बुडाल्याने बेपत्ता झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत खाडीपात्रात शोध सुरू होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी- वराड भंडारवाडी येथील रविकांत पराडकर हे सकाळपासून घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यातच सध्या वराड येथील ब्रिजचे काम सुरू असून त्या पुलाच्या खाली कर्ली नदीच्या खाडीपात्रात ते उतरले होते .खाडी किनाऱ्यावर त्यांचे चप्पल, रुमाल स्थानिकांना दिसून आले. ही चप्पल पराडकर यांची असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती कट्टा पोलिस दुरक्षेत्राच्या पोलिसांना दिली असता पोलिस कर्मचारी रुक्मांगद मुंडे, योगेश सराफदार, संतोष पुटवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांना एक चप्पल, रुमाल तसेच एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत आजाराला कंटाळून आपण आत्महत्या करत असून या बाबत कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. दरम्यान त्यांचा खाडी पात्रात रात्रौ उशिरापर्यंत शोध घेण्यात येत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

You cannot copy content of this page