जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला मान्यता…

*💫मालवण दि.२७-:* निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना बाधितांना मोफत सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या कोळंब,मालवण याठिकाणी असलेल्या केंद्रास कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केली होती. जिल्हा प्रशासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील या पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला मान्यता दिली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे. या कोविड केअर केंद्रात १२ रुग्णांची व्यवस्था असून त्यासाठी लागणारे वैद्यकीय मार्गदर्शन रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुरविणार आहे. दि. २९ एप्रिल रोजी सदर केंद्राचे उद्घाटन आम.वैभव नाईक यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खलीपे यांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्यातील खासगी संस्थानी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेऊन कोरोना प्रसार थांबण्यासाठी अश्या प्रकारच्या उपक्रमासाठी पुढे यावे, असे आवाहनही रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page