नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला शोक;शासन मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले
*💫सावंतवाडी दि.२७-:* जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, तो रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्य सेवक, आशा सेविका, इत्यादी कर्मचारी लढत आहेत. या लढ्यात युवकांची साथ मिळणे आवश्यक असून, युवकांच्या माध्यमातूनच कोरोनाची दुसरी लाट आपण थांबवू शकतो असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी व्यक्त केले आहे. राज्यात लसीचा तुटवडा असल्याने जिल्ह्याला लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. त्यामुळे सद्य स्थितीत दुसऱ्या डोस साठी प्रामुख्याने प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यावेळी रुग्णाच्या सेवेसाठी स्वतः पुढाकार घेऊन पुढे येणाऱ्या एम. बी बी एस डॉक्टर ना भरती वेळी पहिल्यांदा प्राधान्य देणार असल्याचे पण जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
