किल्ले सिंधूदुर्गचा ३५६ वा स्थापनादिन साजरा…

मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन:प्रेरणोत्सव समितिचा पुढाकार

मालवण दि प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी राजधानी म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केल्या जाणाऱ्या मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गचा ३५६ वा वर्धापन दिन मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने मोरयाचा धोडा येथे गणेश पुजन करुन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव घोषणानी परिसर शिवमय झाला होता मालवण दांडी येथील मोरयाचा धोंडा या ठिकाणी आज सकाळी डॉ. रामचंद्र काटकर यांचा हस्ते गणेश पुजा करण्यात आली. या वेळी दुग्धअभिषेक करण्यात आला. यावेळी विजय केनवडेकर सचिव, सौ. ज्योती तोरसकर उपाध्यक्ष, दत्ताञय नेरकर उपाध्यक्ष, भाऊ सामंत, प्रदिप वेगुर्लेकर, चिंतामणी मयेकर, दिपाली नेरकर, सतिश चांदेरकर, निखिल नेरकर, रजत तोरसकर उपस्थितीत होते. छञपती शिवाजी महाराजानी जानभट अभ्यकर यांचा कडुन पायाभरणी पुजा करुन घेतली होती. जानभट अभ्यकर यांचा सहाव्या पिढीतील किरण आपटे यांनी पौरहित्य केले

You cannot copy content of this page