*💫मालवण दि.२७-:* मालवण तालुक्यातील आंबेरी वाकवाडी येथील रहिवासी दिनेश विनायक गोरे (वय २९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान ओरोस येथील रुग्णालयात निधन झाले. दिनेश हे शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. एक तरुण पुरोहित म्हणून काम करताना गोरे भटजी म्हणून ते सर्वत्र सुपरिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.
आंबेरी वाकवाडीतील दिनेश गोरे या युवकाचे निधन
