अजय गोंदावळे:तोवर ठेकेदाराच बील अदा करू नका..
⚡सावंतवाडी ता.१७-: मोती तलावात उभारण्यात आलेला संगीत कारंजामध्ये तांत्रिक बिघड असल्याचे कळते. त्यामुळे त्यातील बिघाड दूर झाल्याबाबत एखाद्या तज्ञाकडून अहवाल घेतला जात नाही तोवर संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावळे यांनी नगरपरिषदेकडे केली आहे. साडेतीन कोटींचा हा कारंजा साकारण्यात आला आहे. पर्यटकांसाठी तो आकर्षण ठरणार आहे. मात्र, यात तांत्रिक बिघाड असल्याचे श्री. गोंदावळे यांचे म्हणणे असून जोवर याचा तज्ञांकरवी अहवाल येत नाही तोवर बील अदा करू नये अशी मागणी केली आहे.
