आंबोली-वेंगुर्ला महामार्गावरील सुरक्षिततेसाठी गतिरोधक वेगमर्यादा व फलक लावा…

सौ. सावित्री पालेकर: राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर..

आंबोली

आंबोली-वेंगुर्ला या महामार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांचा आणि वाहतूक गतीचा विचार करता रस्त्यावर गतिरोधक (रबर स्ट्रिप) आणि वेगमर्यादा दर्शविणारे फलक बसविण्याची मागणी आंबोलीच्या सरपंच सौ. सावीत्री पालकर यांनी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंबोली हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, येथे नेहमीच पर्यटकांची व स्थानिकांची मोठी वर्दळ असते. आंबोली ते वेंगुर्ला या मार्गावर अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण केल्यामुळे वाहने अधिक वेगाने धावत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर काही विशिष्ट ठिकाणी, विशेषतः वळणावर, बसथांब्याजवळ आणि गर्दीच्या वस्ती भागात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर, सततची वाहतूक, जड वाहनांची गर्दी आणि वाढती अपघातांची शक्यता लक्षात घेता संबंधित ठिकाणी वेगमर्यादा फलक व गतिरोधक लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे सरपंच पालकर यांनी म्हटले आहे. या भागात बसथांबे, धोका दर्शवणारे वळण, शाळा, लॉज व मुख्य वस्तीचा समावेश असल्याने या ठिकाणी वाहनचालकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी योग्य अंतरावर माहितीपूर्ण फलक बसवून वाहनचालकांना वेगमर्यादेची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page