आंबोली सैनिक स्कूलचा शंभर टक्के निकाल…

⚡आंबोली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सैनिक स्कूलने यंदाही मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे. सलग 17 वर्षे सातत्याने शंभर टक्के निकाल देणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक घडामोडीतून भविष्य घडविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. भारतीय सैन्यसेवा, संरक्षण क्षेत्र, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने कार्य करणारी ही संस्था केवळ शिक्षणातच नव्हे तर राष्ट्रसेवेसाठी सज्ज करणाऱ्या शिस्तबद्धतेचा मानदंड ठरली आहे. मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या परीक्षेला एकूण 50 विद्यार्थी उपस्थित होते, त्यातील 5 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष श्रेणीत, 40 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 5 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला कॅडेट अशोक विलास घोडके (90.60%), द्वितीय क्रमांक कॅडेट नील अक्षय हिरोळे (90.20%), तृतीय क्रमांक कॅडेट वेदांत रोहिदास वाटकर (90%) आणि त्याचबरोबर कॅडेट आथर्व मंगेश गावडे (90%) यांची कामगिरीही लक्षणीय आहे. शाळेतील निवासी प्रशिक्षण, सुराज्य अनुशासन, अभ्यासात्मक मार्गदर्शन, आणि कठोर मेहनतीचा परिपाक म्हणून या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपलं यश सिद्ध केलं आहे. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभेदार सुरीर सावंत, सचिव श्री. रमेश गवडे, संचालक डॉ. शंकर गवडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. विज्ञान शाखेत प्रवेशासाठीही तयारी सुरू झाली असून, याशिवाय याच शाळेतील अनेक माजी विद्यार्थ्यांनी NDA, JEE CET, NEET परीक्षांमध्ये यश संपादन केलं आहे. हे विद्यार्थी सध्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, मर्चंट नेव्ही, बहुराष्ट्रीय कंपन्या अशा विविध क्षेत्रात सेवेत आहेत. शाळेतील निवासी सैन्य प्रशिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, व्यायाम, साहसी खेळ आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. अशा या गुणवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 9420195518 / 7822924081 या क्रमांकावर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page