सावंतवाडीत माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन…

सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी अर्बन बँकेचे विलीनीकरण टीजेएसबीत झाले असून दर्जेदार सेवा सावंतवाडीत मिळणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या प्रमुख उपस्थितीत
सावंतवाडी येथे टीजेएसबी सहकारी बँकेच्या १५० व्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे टीजेएसबी सहकारी बँकेत झालेले यशस्वी विलीनीकरणही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मंत्री दीपक केसरकर, बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्जून चांदेकर, सौ. उमा प्रभू, अँड. सुभाष पणदुरकर, रमेश बोंद्रे, रमेश पै, अच्युत सावंत भोसले, अशोक दळवी, राजन पोकळे, प्रसाद देवधर, नकुल पार्सेकर, वाय.पी. नाईक, गोविंद वाडकर, सीमा मठकर, व्यवस्थापक सुनील परब आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीजेएसबी सहकारी बँकेने पाच राज्यांतील आपल्या पारदर्शक व परिणामकारक बँकिंग कार्यपद्धतीच्या जोरावर हे विलीनीकरण यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे. सावंतवाडी येथील मुख्य शाखेचे उद्घाटन टीजेएसबी बँकेची १५० वी शाखा म्हणून करण्यात आले. यासोबतच सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील सर्व कर्मचारी टीजेएसबी बँकेत पूर्णतः समाविष्ट झाले आहेत. टीजेएसबी सहकारी बँक ही देशातील आघाडीची सहकारी बँक असून १९७२ साली स्थापन झालेली बँक असून आज महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहे. एप्रिल २०२५ अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय २३,१०५ कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यापैकी ८,२५६ कोटी रुपये कर्जवाटप व १४,८४९ कोटी रुपये ठेवी आहेत. बँकेने आपल्या पारदर्शक व ग्राहककेंद्रित कार्यपद्धतीच्या जोरावर सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. या विलीनीकरणामुळे टीजेएसबी सहकारी बँकेने आपल्या विस्तार आणि सेवांच्या गुणवत्तेत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. ज्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे.

You cannot copy content of this page