चिंदर येथील ब्राह्मणदेव मंदिरात ११ रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.०९-:
मालवण तालुक्यातील चिंदर- हडकरवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिरात रविवार, ११ मे रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यानिमित्त सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजने, रात्री १० वाजता ब्राह्मणदेव नाट्य मंडळ, चिंदर सडेवाडी निर्मित ‘चांदणे शिंपीत जा’ नाटक सादर होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन ब्राह्मणदेव सेवा मंडळ, चिंदर सडेवाडी हडकरवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page