वेंगुर्ले तुळस घाटीत वळणावर रिक्षा पलटी होऊन अपघात…

महिला गंभीर जखमी : दोन लहान मुले सुदैवाने बचावली..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस घाटी येथे वेंगुर्लेच्या दिशेने जाताना रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. यात असलेल्या एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर रिक्षा मधील दोन मुले मात्र सुदैवाने बचावले असून सुखरूप आहेत.
हा अपघात आज (९ मे) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुळस घाटी येथे घडला. तुळस मार्गे वेंगुर्ले येथे जाताना तीव्र उतारावर वेंगुर्ले हद्दीत असलेल्या वळणावर रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. दरम्यान ही रिक्षा दाभोली येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रिक्षामध्ये २ महिला, एक १० वर्षाचे बाळ व एक ५ वर्षाचा मुलगा असे प्रवासी होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

You cannot copy content of this page