⚡मालवण ता.०९-:
मालवण सोमवार पेठ येथील देवी भैरवी देवालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. २० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी ८.३० वाजता होम, देवाचा नारळ बदलणे, ११.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी २ ते रात्री १० पर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता अष्टपैलू कलानिकेतन, मालवण प्रस्तुत ‘स्वरसंध्या’ (सादरकर्ते-सुनील परुळेकर), रात्री ८ वाजता विश्वकर्मा भजन मंडळ, राठिवडेचे संगीत भजन, १० वाजता बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्गचा ‘भवानी शंकर’ नाट्यप्रयोग आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
