आबा धारगळकर:सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन केले सादर..
⚡बांदा ता.०८-: बांदा महसूल मंडळ अधिकारी वयक्तिक सुट्टीवर असल्याने विद्यार्थी दाखल्यांसह अनेक महत्वाची शासकीय कामे खोळंबली आहेत. त्यामुळे याठिकाणी रजा कालावधीत तात्काळ प्रभारी अधिकारी द्यावा अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बांदा महसूल मंडळ अधिकारी हे आठ दिवस वयक्तिक रजेवर आहेत. मात्र याठिकाणी प्रभारी कार्यभार देण्यात न आल्याने अनेक महसूलविषयक कामे खोळंबली आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे दाखले तसेच विविध शासकीय बँकेच्या कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र समकक्ष अधिकारी नसल्याने पेंडिंग राहिली आहेत. त्यामुळे स्थानिक ई सेवा केंद्रावर अतिरिक्त ताण येत आहे. वेळेत कामे पूर्ण होत नसल्याने स्थानिकांच्या रोषाला देखील त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी रजा कालावधीत तात्काळ अधिकारी उपलब्ध करून द्यावा.
सध्या बारावीचा निकाल लागल्याने विद्यार्थी दाखल्यांसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कामे देखील वाढली आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो:-
आबा धारगळकर.
