काळसेतील गंगादेवी मंदिर जीर्णोद्धारचा रौप्य महोत्सव…

⚡मालवण ता.०८-:
मालवण तालुक्यातील काळसे येथील श्री गंगादेवी मंदिर जीर्णोद्धारचा रौप्य महोत्सव दि. ९ व १० मे रोजी नमसवाडी – काळसे गंगादेवी मंदिरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त शुक्रवार ९ रोजी सकाळी ९ वा. नवचंडी होमहवन, सायं. ६.३० वा. आरती, ७ वा. मान्यवरांचा सत्कार, अतिथी स्वागत, रात्री ९ वाजता ॐकार डान्स अकॅडमी, सावंतवाडी निर्मित साईलीला, तिरुपती बालाजी दर्शन, अयोध्यापती रामलल्ला देखावा, तमिळनाडू येथील दहा फुटी सुब्रमण्यम देव देखावा सादर होणार आहे. शनिवार, १० रोजी स. १० वा. सत्यनारायण महापूजा, दु. १२.३० वा. महाप्रसाद, सायं. ६.३० वा. आरती, सायं. ७ ते रात्री ९. वा.पर्यंत स्थानिक मुलांचे नृत्य, रात्री ९.३० वा. डबलबारी सामना बुवा संतोष शितकर विरुद्ध बुवा समीर गावडे यांच्यात होणार आहे. लाभघ्यावा, असे आवाहन गंगादेवी मंदिर उत्सव समितीने केले आहे.

You cannot copy content of this page