⚡बांदा ता.०५-: बांदा पोलीस ठाण्यातर्फे बांदा शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पोलिस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांदा कट्टा येथे अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन प्रभात फेरीची सुरवात करण्यात आली. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी शपथ दिली. प्रभात फेरी शहरातील गांधी चौक, उभा बाजार, तेली आळवाडी मार्गे आठवडा बाजार मैदानावर संपविण्यात आली. प्रभात फेरी च्या शेवटी आठवडा बाजारात पोलीस निरीक्षक विकास बडवे व पोलीस कर्मचारी यांनी अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम आठवडा बाजारात आलेल्या व्यावसायिक व ग्राहकांना समजावून सांगितले व फेरीची सांगता करण्यात आली.
फोटो:-
बांदा येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती प्रभात फेरीत सहभागी झालेले पोलीस निरीक्षक विकास बडवे, सरपंच प्रियांका नाईक, आबा धारगळकर व इतर. (छायाचित्र – नीलेश मोरजकर)
