दि. ३ व ४ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम..
कुडाळ : श्री देवी सातेरी देवस्थान समिती परूळे-भरणीवाडी, ता. वेंगुर्ला, याच्या वतीने परूळे गावातील ३२ वाडीची ग्रामदेवता श्री देवी सातेरी देवस्थानचा ८ वा वर्धापन दिन वैशाख शु. ६, शनिवार ३ व ०४ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे
यानिमित्ताने कार्यक्रम शनिवार ३ मे रोजी सुश्राव्य भजन श्री देवी माऊली प्रासा. भजन मंडळ, वालावल सकाळी ७ ते ८ वा. मंगलवाद्य ८ से १२ वा.पूजा व अभिषेक सायं ४.०० वा.सुश्राव्य भजन श्री देवी माऊली प्रासा. भजन मंडळ, वालावल वालावल (बुवा : श्री. तेजस मयेकर)पुरस्कर्ते : अरूण मसुरकर सायं. ७ ते ८ वा.सुश्राव्य भजन (बुवा कु. श्रीशा प्रकाश राणे)८ वा.बाल दशावतार नाट्यमंडळ, डिगस (महिला) यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग मधु कैटभ. रविवार दि. ४ मे रोजी सकाळी ७ ते ८ वा. मंगलवादय, ८ ते ९ वा.पूजा व अभिषेक ९ ते ११ वा. श्री सत्यनारायण महापुजा. १०.०० वा.ढोलपथक श्री आई माऊली ढोल पथक, चेंदवण, दुपारी १२.३० वा.महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद सायं. ४ ते ७ वा.सुस्वर भजन श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे
(बुवा : श्री. तुषार खुळे) पुरस्कर्ते अरूण मसुरकर, सायं.७ ते ८ वा. पारंपरिक व आधुनिक फुगड्या सादरकर्ते श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ पुरस्कर्ते : सौ. संजना करंगुटकर, रात्रौ ८ ते ९ वा.सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ ९ वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान, भरणी यांनी केले आहे.
