कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संस्था असलेल्या बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या वतीने बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ मे २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण शिबीर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यात नावलौकिक असलेली आणि ५३ वर्षांची यशस्वी नाट्य परंपरा असलेली नाट्यसंस्था आहे. ही संस्था वर्षभर अनेक सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवित असते. बाल रंगभूमीसाठी सुद्धा या संस्थेचे फार मोठे योगदान आहे. या संस्थेच्या वतीने येत्या ५ मे ते १५ मे या कालावधीत बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चिं. त्र्यं. खानोलकर ललित केंद्र, कुडाळ हायस्कुल येथे दररोज सायंकाळी ४.०० ते ६.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. यासाठी वय वर्षे ५ ते १५ हा वयोगट आहे. ही कार्यशाळा सशुल्क आहे. या बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत शोण घुर्ये आणि साहिल देसाई हे नाट्यशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी गुरुप्रसाद शिरसाट (९४२०३०७३२३) किंवा सचिन कोंडस्कर (९९७५५५२४१२) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांनी केले आहे.
